अंकले येथे वीज विद्युत उपकेंद्राच्या उद्घाटनाला मोठ्या संखेने उपस्थित रहा: शंकरराव वगरे

 


पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे  यांच्या हस्ते होणार उद्घाटन

  जत( प्रतिनिधी)अंकले येथे लोकवर्गणीतून जिल्हा परिषद मराठी शाळेच्या खोल्या दुरुस्थिकरण व संरक्षण भिंतीचे चे उद्घाटन सोहळा तसेच वीज विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन. प्रधानमंत्री जलजीवन मशीन जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजने अंतर्गत गावाला वाड्या वस्त्या आणि गावठाण सहित सुधारित नळपाणी योजना अशा विविध कामाचे उद्घाटन सोमवारी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते व माजी आमदार मा. विलासराव जगताप साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होनार आहे यावेळी  भाजपा चे पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत अंकले पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ व शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यसम्राट लोकनेते शंकरराव वगरे सर यांनी केले आहे


अंकले येथील जिल्हा परिषद शाळा येथे अनेक दिवसापासुन वर्ग खोल्या अपुऱ्या असल्यामुळे लहान मुलीना भाड्याच्या वर्ग खोल्या मध्ये शिकवले जात होते, सातत्याने मागणी करूनही शासनाकडून वर्ग खोल्या मिळाल्या नाहीत, त्यामुळे श्री शंकर वगरे सर यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून तीन शाळा खोल्या दुरुस्त केल्या आहेत.

 गेली 25 वर्ष प्रलंबीत अंकले, बाज,बेळुंखी, डोर्ली या चार गावचा विजेचा प्रश्न शंकर वगरे सर यांच्या अथक प्रयत्नाने व जगताप साहेबांच्या माध्यमातून अखेर सुटला

   भाजपा जत तालुका उपाध्यक्ष

        राजू चौगुले

Post a Comment

Previous Post Next Post