मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार ते ब्रीच कॅंडी रुग्णालयात ते उपचार घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीने पत्रक काढून दिली आहे.
सतत दौरे करून जनतेमध्ये मिसळणारे नेतृत्व म्हणून खा. शरद पवार यांची ओळख आहे. वयाच्या ८० वर्षानंतर ही त्यांचा उत्साह कमी झालेला दिसत नाही. २ नोव्हेंबर ला डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पुन्हा सक्रिय होणार आहेत. ३ नोव्हेंबरला ते शिर्डी येथे जाणार असून ४ ते ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिबिरासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.