बार्शी-कुर्डूवाडी रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले




रिधोरे  (अतुल गवळी):- बार्शी-कुर्डवाडी रोडवर शेंद्री स्टेशन व साक्षी पेट्रोलियम,रिधोरे यांच्यामध्ये आंदोलकांनी ट्रॅक्टरचे चारही टायर फोडले.हा प्रकार हॉटेल शिवराय जवळ घडला आहे. ऊसाला पहिला २५००रुपये व अंतिम दर ३१०० रुपये मिळावा अशी ऊस दर संघर्ष समितीने मागणी केली आहे.मात्र साखर कारखानदारांनी कारखाना सुरू होऊन जवळपास दहा ते पंधरा दिवस उलटून देखील ऊस दराविषयी आपली भूमिका जाहीर केली नाही.काल देखील उपप्रादेशिक साखर आयुक्तालय, सोलापूर यांच्या नियोजनाखाली मा.जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली व ऊस दर संघर्ष समिती व साखर कारखानदार यांच्यामध्ये नियोजन भवन,सोलापूर येथे बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीला बऱ्याचशा कारखानदारांनी अनुउपस्थिती दाखवली.त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.सुरुवातीला ऊस दर संघर्ष समितीने गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत नंतर आता गनिमी काव्याचे शत्र उचलले आहे व  आंदोलन सुरू केले आहे.त्याचाच एक भाग म्हणून आजची ही घटना घडली आहे.

No comments:

Post a Comment