गंधोरा जिल्हा परिषद शाळेत शिष्यवृत्ती पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारसलगरा,दि.११(प्रतिक भोसले)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील जिल्हा परिषद शाळेचे ३ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाल्याने त्यांचा विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे यांच्या हस्ते काल दि.१० नोव्हेंबर रोजी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

 यामध्ये वैष्णवी संतोष मुसळे (१७२), प्रथमेश संतोष भोसले (१३८), प्रणाली कृष्णाथ एकंडे (१३४) या सर्व पात्र विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. या वेळी विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे, सतीश हुंडेकरी, मुख्याध्यापक विश्वनाथ जट्टे, विजय माने, शंकर जिंदे, मोहनदास चव्हाण, हिरामन मोराळे, श्रीम. पुष्पलता करडे, श्रीम. आशा भोसले

संतोष मुसळे, विश्वनाथ एकंडे, मधुकर राठोड, संजय भोसले, गणेश राठोड, प्रवीण पाटील, प्रभाकर भोसले, तानाजी भोसले, कल्याण जाधव, विठ्ठल जेठीथोर यांच्या सह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment