भूम येथे लोक अदालत मध्ये जनसेवा नागरी सहकारी बँक तर्फे अन्नदान वाटपभूम (प्रतिनिधी)-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने भूम येथे लोक आदालत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनसेवा नागरी सहकारी बँक भूम व मानव व्यसनमुक्ती केंद्र भूम यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान करण्यात आले. भूम येथे झालेल्या लोक आदालतीमध्ये सात प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.कार्यक्रमा प्रसंगी मा. श्री. एम.आर. उगले,जिल्हा न्यायाधीश साहेब मा. श्री. विश्वास माने  सत्र न्यायाधीश साहेब, मा. श्री. चेंडके साहेब दिवाणी न्यायाधीश साहेब. मा.श्रीमती एस. के. पाटील दिवाणी न्यायाधीश साहेब व मुंडे साहेब अध्यक्ष विधिमंडळ भूम उपस्थित होते. जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीराम मुळे अभियोक्ता प्रवीण गाडे व बँकचे कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment