दैनिक जनमत : ऊसदर संघर्ष समितीचा सिना नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Sunday, November 13, 2022

ऊसदर संघर्ष समितीचा सिना नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

 


रिधोरे (अतुल गवळी) "ऊसाला पहिली उचल २५००रुपये मिळालीच पाहिजे", "ऊस दर आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा" "ऊस दर संघर्ष समितीचा विजय असो... 

 "कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही" अशा घोषणा देत ऊसदर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व आंदोलकांनी आज दुपारी ३: ३०च्या सुमारास सिना नदीमध्ये उतरून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर चोख बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळं मोठा अनर्थ टळला.

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न निर्णय वळणांवर आला असून ऊस दरासाठी ऊस दर संघर्ष समितीच्या आंदोलकांनी थेट सिना नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

     शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिपक भोसले,बळीराम गायकवाड, सुहास गायकवाड,अण्णा जाधव,बापू गायकवाड,दत्ता पंडित,अनंत करळे, विकास गायकवाड, समाधान फाटे, यांच्यासह संघर्ष समितीच्या इतर सदस्यांनी नदीपात्रात आंदोलन केले.

यावेळी कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरिक्षक विक्रांत बोधे,माढ्याचे सहा.पोलिस निरीक्षक श्याम बुवा,पोलिस निरीक्षक हनुमंत वाघमारे,पो.ह.घाडगे,बी.एस, पो.कॉ.दत्ता सोमवाड,जय नलवडे,शिवाजी कांबळे,व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेत नदीपात्रातील आंदोलनकर्त्यांना बाहेर येण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलनकर्ते ऊसाला दर मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत नदीपात्रातून बाहेर आले.

वारणावती येथील वन्यजीव कार्यालय परीसरात नरक्याच्या गोडाऊनला संशयास्पद आग

 करोडो रुपयांचा नरक्या व तीन वाहने आगीत जळून खाक; वन्यजीवच्या निष्क्रियतेचा कळस ! शिराळा दि. ०१(प्रतिनिधी) याकुब मुजावर                वारणा...