दैनिक जनमत : तोडणीस आलेला साडेतीन एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Sunday, November 6, 2022

तोडणीस आलेला साडेतीन एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

 वाकडी शिवारातील घटना

रविद्र अंधारे व दिलीप अंधारे यांच्यावर आर्थीक संकट कोसळले....
 परंडा (भजनदास गुडे)परंडा तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी रविंद्र अंधारे व दिलीप अंधारे या दोन शेतकर्‍यांच्या मालकीचा असलेला सुमारे साडेतीन एकर क्षेत्रावरील तोडणीस आलेला उभा ऊस शॉर्टसर्किट झाल्यामुळे जळून गेला आहे.या रविंद्र अंधारे व दिलीप अंधारे यांच्यावर आर्थीक संकट कोसळले आहे.

      हे दोन्ही शेतकरी आधीच आर्थिक संकट असताना या ही संकटाला सामोरे जावे लागले आहे.या घटनेची माहिती दोन्ही शेतकऱ्यांनी त्वरित गावकामगार तलाठी यांना दिली आहे.

         ऐन हिवाळ्याचे दिवस असताना दि.५ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने मोठी आग याठिकाणी निर्माण झाली.या आगीमुळे रविंद्र अंधारे यांचा ८६०३२ जातीचा दोन एक्कर व दिलीप अंधारे यांचा २६५ जातीच दिड एक्कर वरील तोडणीस आलेल्या उसाने त्वरित पेट घेतला.या आगीमुळे अंधारे यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. 

      यापूर्वीही अनेक वेळा महावितरण कंयणीच्या अधिकार्‍यांना, कर्मचाऱ्यांना आमच्या शेतात विद्युत तारांचा एकमेकांना संपर्क होत असल्याने जळीत घटना घडलेल्या आहेत. या तारांचा बंदोबस्त करा,अशी मागणी शेतकर्‍यांनी वेळोवेळी केली. मात्र त्यांनीही या कामात हलगर्जीपणा केला म्हणून आमचा परिपक्व तोडणीस आलेला ऊस ऐन मौसममध्ये जळून गेल्याने या घटनेला महावितरणचे कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप रविंद्र अंधारे व दिलीप अंधारे या शेतकर्‍यांनी केला आहे.

    आमच्या झालेल्या ऊस नुकसानीची आम्हाला त्वरित नुकसान भरपाई करून द्यावी, अशी मागणीही अंधारे बंधूंनी केली आहे.या घटनेचा पंचनामा येथील तलाठी यांनी करून तो अहवाल त्वरित परंडा तहसीलदार यांना पाठवून या शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.    

     ऐन दुपारच्या वेळेत अचानक लागलेल्या या आगीमुळे येथील शेतकर्‍यांची मोठी तारांबळ उडाली.शेजारील या भागातील शेतकर्‍यांच्या मदतीने आग विझवण्यात आली.अन्यथा शेजारील शेतकर्यांच्या वीस ते पंचवीस एक्कर वरील उसालाही आग लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते.परंतु पुढील अनर्थ शेतकऱ्यांच्या सर्तकतेमुळे टळला.

-----------------------------------

  अनेक वेळा महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना आमच्या शेतातील या लोंबलेल्या तारांचा बंदोबस्त करा म्हणून मागणी केली.मात्र बिल घ्यायला पुढे आणि काम करायला मागे या निष्काळजी धोरणामुळे आमचा तोडणीस आलेला ऊस जळाला.या घटनेची आम्हाला मुबलक भरपाई न मिळाल्यास आम्ही न्यायालयात महावितरणच्या विरोधात दावा ठोकणार असल्याचेही रविंद्र अंधारे व दिलीप अंधारे या शेतकर्‍यांनी सांगितले.

वारणावती येथील वन्यजीव कार्यालय परीसरात नरक्याच्या गोडाऊनला संशयास्पद आग

 करोडो रुपयांचा नरक्या व तीन वाहने आगीत जळून खाक; वन्यजीवच्या निष्क्रियतेचा कळस ! शिराळा दि. ०१(प्रतिनिधी) याकुब मुजावर                वारणा...