सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणी साठी ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महामोर्चाची जय्यत तयारी
परंडा येथील कोटला मैदानावर भव्य स्टेज उभारणीचे काम अंतीम टप्प्यात
सकल मराठा महामोर्चाला लाखो मराठा समाजाची गर्दी उसळणार
परंडा (भजनदास गुडे - दि ६ नोव्हेंबर ) सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन ५० टक्के च्या आत कायदयाच्या चौकटीत टिकनारे आरक्षण मिळावे या मागणी साठी सकल मराठा समाजाच्या वतीने दि ८ नोव्हेंबर रोजी परंडा येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे .
या मोर्चाची सुरूवात सोनारी रोड येथील छत्रपती संभाजीराजे चौकातून होणार आहे तर सभेचा समारोप रूई रोड येथील कोटला मैदानात होणार आहे .
कोटला मैदानावर भव्य असा स्टेज उभारण्यात येत असुन याच स्टेज वरून मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यां पाच मुली उपस्थीत सकल मराठा जनसमुदायाला सकाल मराठा समाजाला शिक्षण व नौकरीसाठी आरक्षणाची कीती गरज आहे याविषयी संबोधीत करणार आहेत.तसेच यांच ठिकाणी सकल मराठा समाजाच्या पाच मुली व पाच महीला च्या हस्ते उपविभागीय अधिकारी यांना सकल मराठा समाजाला आरक्षण मीळावे या मागणीचे निवेदण देणार आहेत.
सभा ठिकाण व परिसरातील साफ सफाई करण्यात आली आहे अभुतपुर्व असा महामोर्चा होणार असल्याने सकल मराठा समन्वय समीती कडून जय्यत तयारी सुरू आहे.त्याचा भाग म्हणूण दि६ नोहेबर रोजी सकल मराठा समन्वय समीतीच्या सदस्यांनी सभास्थळी भेट देऊन ग्राऊन्ड,लाईट,स्टेज,बॅरेकेट, महीला,पुरुषाच्या व पत्रकारांच्या कक्षाची पाहाणी करुन आढावा घेतला.व या महामोर्चात लाखो च्या संखेने मराठा समाज बांधवानी सहभागी व्हावे असे अवाहन समन्वय समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.