दैनिक जनमत : कवठेमहांकाळ तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण थंडीच्या दिवसात तापले, गावागावात बैठकांचा सिलसिला, पडद्यामागील घडामोडींना वेग

Sunday, December 4, 2022

कवठेमहांकाळ तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण थंडीच्या दिवसात तापले, गावागावात बैठकांचा सिलसिला, पडद्यामागील घडामोडींना वेग

तालुक्यात सरपंच पदासाठी 167 अर्ज तर सदस्य पदासाठी 1004 अर्ज दाखलकवठेमहांकाळ (तानाजी शिंगाडे)

कवठेमहांकाळ तालुक्यातील होऊ घातलेल्या  28 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थंडीच्या वातावरणात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. यामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.पण माघार नंतरच प्रत्येक गावातील राजकीय वातावरण रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. शुक्रवार 2 डिसेंबर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालय तुडुंब भरले होते सरपंच पदासाठी 167 तर सदस्य पदासाठी 1004 अर्ज दाखल झाले सरपंच व सदस्य पदासाठी अर्जांची गावनिहाय आकडेवारी खालील प्रमाणे.

अलकुड (एस) 9 - 23, आरेवाडी 3 - 23, ढोलेवाडी 7 - 27, हरोली 1- 14, कोंगनोळी 5 - 21, नरसिंहगाव ३ - ३१, शिंदेवाडी (हिं) 4 - 25,  चुडेखिंडी 4 - 25, हिंगणगाव 10 - 23, खरशिंग 4 - 26, लंगरपेठ 4 - 26, लोणारवाडी 7 - 28, शिरढोण 5 - 32, वाघोली 5 - 19, जायगव्हाण 4 - 26, आगळगाव 5 - 53,

अलकुड (एम) 6 - 28, घाटनांद्रे 6 - 41, जाखापूर 4 - 25, केरेवाडी 11- 7, कुची 4 - 49, कुकटोळी 5 - 45, रांजणी 6 - 77, विठुरायाचीवाडी 6 - 48, बोरगाव 12 - 58, सराटी  4 - 14, शेळकेवाडी 3 - 17, नागज 12 - 58. अर्ज दाखल झाले आहेत.


चौका चौकात रंगल्या चर्चा.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केल्यानंतर गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकांची चर्चा सुरू झाली चौका चौकात कट्या कट्यावर लोक याबाबत चर्चा करताना दिसत आहेत. आत्तापर्यंत कार्यकर्त्यांच्या पातळीवर सुरू असलेली चर्चा मतदारापर्यंत पोहोचली आहे. ग्रामीण भागातील मतदारांची मनधरणी करताना आता पुढार्‍यांना कसरत करावी लागणार आहे. ग्रामपंचायत च्या निवडणुका जाहीर झाल्या तसा ग्रामीण राजकारणांनी वेग घेतला आहे. या ठिकाणचे राजकारण तापू लागले आहे. गाव पुढार्‍यांची मतदारांवर प्रभाव असणारे कार्यकर्ते मिळवण्यासाठी धावाधाव सुरू आहे. खुले सरपंच पद असलेल्या ठिकाणी अत्यंत चुरशीने निवडणूक होणार आहे या ठिकाणी काट्याची टक्कर अपेक्षित आहे. सरपंच पदाबरोबरच सदस्य पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे थेट जनतेतून सरपंच पद असल्याने गावाची सारी सूत्रे सरपंचाच्या हातात राहणार आहेत प्रत्येक गटाचे सरपंच पदाचा उमेदवार हे पहिले टार्गेट असणार आहे पॅनल प्रमुखांना सरपंच पदाचा उमेदवार निवडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे उमेदवार हा जनतेच्या पसंतीस उतरणारा आणि महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या मर्जीतील असा महत्त्वाचा निकष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खुल्या प्रवर्गातील सरपंच पदासाठी पॅनल प्रमुखापैकी कोणाला तरी एकाला संधी मिळणार हे उघड गुपित आहे. कारण सत्तेच्या चाव्या कोणीही दुसऱ्याच्या हातात देणार नाही हे वास्तव आहे कारण केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायत यांना मिळत असतो कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमासाठी सर्वच राजकीय पुढारी आजी-माजी सरपंच आणि ग्रामपंचायत यांचे भावी सदस्य सरपंचाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आत्ता कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आहे ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावण्यासाठी तरुण मोठ्या प्रमाणावर उडी घेत आहे गाव पातळीवरील निवडणुकीत तरुणांचा चांगला सहभाग वाढत असल्याने चित्र दिसत आहे. यातून अनेकांची एकाधिकारशाही ही संपुष्टात येणार आहे कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात आणि नेत्यांनी गावच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे याचा फटका या निवडणुकीत त्यांना बसणार आहे निवडणूक आणि मतदानाबाबत आता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. निवडणुका लागल्यानंतर कार्यकर्त्यांची जुळवा जुळवा करावी लागत आहे. निवडणुकीत होणारा खर्च ही सामान्यांच्या आवाक्या बाहेरच आहे कवठेमहांकाळ तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचात मध्ये गुलाबी थंडीत गावागावातील राजकारण तापू लागले आहे. पॅनलच्या उभारणीसह उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठकावर बैठका घेतल्या जात आहेत.