दैनिक जनमत : चार हजाराची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Monday, December 19, 2022

चार हजाराची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 


उस्मानाबाद - ग्रामीण स्तरावर लाचखोरी किती बळावली आहे याचा प्रत्यय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत असलेल्या कारवाया पाहून कळते. एका ग्रामसेवकाला चार हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड,वय 44  वर्षे 

पद,ग्रामसेवक ,सजा कुमाळवाडी अंतर्गत आळणी आणि तुगाव, पंचायत समिती कार्यालय उस्मानाबाद जि. उस्मानाबाद यांनी तक्रारदार ( वय ६५) यांचे राहते घर असलेल्या गायरान जागेची तक्रारदार यांचे नावे नोंद घेण्यासाठी तसेच घरकुल मंजुरीसाठी आरोपी लोकसेवक नामे सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4,000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्यानंतर संबंधित ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ डिसेंबर रोजी ताब्यात  घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा अधिकारी :- विकास राठोड, पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद यांनी काम पाहिले तर सापळा पथकात पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख ,मधुकर जाधव, विशाल डोके,सचिन शेवाळे यांचा सहभाग होता.संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद,विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद.प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद यांनी कारवाईसाठी मार्गदर्शन केले