सुधाताई महारुद्र मोटे यांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न

 
डॉ.सोनाली मोटे यांनी ५ वी ते १२ वी शिक्षण घेत असलेल्या १०० मुलीच्या पदवी पर्यतच्या शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी

परंडा (भजनदास गुडे ) बाणगंगा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट भूम संचलित कै.महारुद्र बप्पा मोटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परंडाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्धघाट व बक्षीस वितरण संस्थेच्या अध्यक्षा सुधाताई महारुद्र मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

       यावेळी संस्थेचे संचालक अॅड.रणजीत दादा मोटे,डॉ.सौ. सोनाली रणजीत मोटे,चि. नंदवर्धन रणजीत मोटे,बाणगंगा सहकारी कारखान्याचे संचालक भाऊसाहेब खरसडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड.संदीप पाटील,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पाटील जिल्हा मजूर फेडरेशन संचालक राजाभाऊ पाटील, अॅड.सुहास पाटील,अतुल गोफने, महेश खुळे,नंदू शिंदे,श्रीहरी नायकवडी,डॉ.वाघमोडे,चत्रगुन जाधव,ताहेर पटेल,अमर यादव, आण्णा बुरंगे,गिरवलीचे सरपंच मोटे,सुचित सातपुते सर, बाणगंगा हायस्कूलचे मुख्याध्यापक मधुकर लिमकर सर,रामेश्वर विद्यालय शिराळाचे मुख्याध्यापक नारायण कडेकर सर,महारुद्र बप्पा मोटे विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत यादव सर,परंडा पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक कविता मुसळे मॅडम,रामराजे शिंदे, यांच्यासह विद्यार्थी,पालक, शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

    यावेळी विद्यालयातीला कुस्ती, ऍथलेटिक्स,कबड्डी,कराटे,विज्ञान प्रदर्शन,शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी मध्ये प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुधाताई महारुद्र मोटे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला,

        डॉ.सौ.सोनाली रणजीत मोटे यांनी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या मुली पैकी  गरजूवंत १०० मुलींना दत्तक घेऊन पदवी पर्यंतचा सर्व खर्च करण्याचे जाहीर केले.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विभागीय अध्यक्षा सौ.वैशालीताई राहुल मोटे यांचा ३१ डिसेंबरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गॅदरिंगच्या कार्यक्रमात सुधाताई मोटे,डॉ.सोनाली मोटे,व ॲड. रणजीत दादा मोटे यांच्या हस्ते केक कापून वैशालीताई मोटे यांना शुभेच्छा दिल्या.

     मोटे विद्यालयाचा मुलींचा कबड्डी संघ मुंबई येथे होणाऱ्या कबड्डी क्रिडा स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.त्याचे नुकतेच पत्र विद्यालयाला प्राप्त झाले असून  त्यांचे अभिनंदन करण्यात आले.    

     या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये  इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक अशा पद्धतीने आपल्या कलागुणाचे सादरीकरण करून स्रोत्यांना तीन तास मंत्रमुग्ध केले .

         विद्यालयाचे व कॉलेजचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शरद झोंबाडे सर,प्रा.सौ वनवे मॅडम, जगताप सर,सुरवसे सर,यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले होते .

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.शरद झोंबाडे,बाबूराव काळे सर व प्रा.वणवे मॅडम यांनी केले.

           हा कार्यक्रम यशस्वीते साठी विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत यादव सर,पटेल सर,सुधीर यादव सर,प्रा.मारकड सर,प्रा.देशमाने सर,प्रा.अजित देशमुख,प्रा. रणजीत देशमुख,प्रा.खैरे सर,प्रा. मणियार सर,प्रा.आटोळे सर,प्रा.मेटकर सर्,भोरे सर,सरडे सर,भोसले सर,साठे सर,हाके सर, इतापे सर,भैरट सर यांच्यासह राजाभाऊ बनसोडे,अशोक कोकणे,देविदास गरड,थोरबोले या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post