दैनिक जनमत : दुधगाव ग्रापं निवडणुकीत परिवर्तन पॅनल विजयी,कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून केला जल्लोष

Wednesday, December 21, 2022

दुधगाव ग्रापं निवडणुकीत परिवर्तन पॅनल विजयी,कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून केला जल्लोष

 


उस्मानाबाद:

उस्मानाबाद तालुक्यातील  दुधगाव येथील अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलने सरपंच पदासह ७जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले आहे.

येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या ७असून  गावातील एकुण मतदान ८७०होते तर  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  तिरंगी लढत पाहायला मिळाली.ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून पॅनल प्रमुख अमर मुलाणी, रविंद्र चव्हाण, अमीन काटे, विनोद चव्हाण, इन्नुस शेख, खालिल शेख, हामजू सय्यद, तय्यब सय्यद, गणेश पाटील, कय्युम मुलाणी आदींनी गावातील सर्व नागरीकांच्या भेठीगाठी समस्या जाणून घेत प्रचार यंत्रणा  राबवून निवडनुकीत मतदान करण्याचे आवाहन केले होते. आ. राणाजगजितसिंह पाटील व खा.ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत परिवर्तन पॅनल ची स्थापना केली होती . यापूर्वी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील यांचे बंधू शाम सुंदर पाटील यांची सत्ता होती.जनतेने त्यांना नाकारले असुन त्यांना फक्त ४० मतांवर समाधान मानावं लागले आहे.दुधगाव येथील जनतेने विश्वास टाकून परिवर्तन पॅनला विजयी केले. यामध्ये सरपंच पदाचे उमेदवार शीला पुरी३६४मतांनी विजयी झाल्या यांच्यासह खा.निंबाळकर गटाचे ५तर आ. पाटील गटाचे २उमेदवार विजयी झाले आहेत.

निवडणुक निकालाची घोषणा होताच विजयी पॅनलच्या समर्थकांनी  गुलाल उधळत, फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.