दैनिक जनमत : मंत्रीपदासाठी गद्दारी करणाऱ्या सावंताना धडा शिकवा

Thursday, December 8, 2022

मंत्रीपदासाठी गद्दारी करणाऱ्या सावंताना धडा शिकवामहाप्रबोधन यात्रेत शिवसेना उपनेत्या सुषमा आंधारे यांचे उपस्थित जनसमुदायाला  आवाहन

परंडा - शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे व परंडा विधानसभा विधानसभा मतदारसंघातील जनतेशी आ. तानाजी सावंत यांनी मंत्रीपदा साठी गद्दारी केली आहे.याचा हिशोब येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चुकता करा असे अहवान शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले,
  परंडा येथील आठवडी बाजार मैदानावर दि ६ डिसेम्बर रोजी सायंकाळी ९ च्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या,परंडा  विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा आरोग्यमंत्री  तानाजी सावंत यांना ( भाऊ ) म्हणुन त्यांच्यावर सडकून टीका केली,
      सुषमा आंधारे यांच्या सभेला रात्री उशीर झाला तरी सभा ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय  उपस्थित होता,जनसमुदया समोर सुषमाआंधारे यांनी आपल्या शैलीतुन सावंत यांची खिल्ली उडवली,सावंत हे वाचाळ बोलतात त्यांना कोठे काय बोलायचे याचे ज्ञान नाही,त्यांनी कधी हफकिन,तर कधी धरण खेकड्याने फोडले,तर महाराष्ट्र भिकारी होईल पण सावंत होणार नाही,आरक्षणाची खाज आमची आल्यावर आली का असे अज्ञानपणाची वक्तव्य केले आहेत.ते पैशाने अरबोपत्ती, खरबोपती असल्याने त्यांना पैशाचा माज आहे,पैशाच्या जोरावर गद्दारी केली आहे असा अरोप केला.
       त्या पुढे म्हणाल्या की सध्या राज्यात महापुरुषांची बदनामी करून घाणेरडे राजकारण केले जात आहे,आशा राजकारणामुळे  जनतेत तीव्र संताप आहे, सरकारला धडा  शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही असा इशारा अंधारे यांनी दिला,शिवसेनाला संपवायला निघालेले संपतील परंतु शिवसेना कधीच संपणार नाही, इतर पक्षात असताना ते भ्रष्टाचारी होते मात्र भाजपमध्ये गेल्यावर त्यांना भ्रष्टाचारी नसल्याचे प्रमाणपत्र भाजपवाले देतात असा टोला अंधारे यांनी लगावला.
    खासदार ओमराजे निबांळ्कर, जोतीताई ठाकरे,शरद कोळी, दिलीप शाळु,मेघराज पाटील यांनी उपस्थीत जनसमुदायाला संबोधीत कले.
       या वेळी व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, ज्योती ठाकरे,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील,जिल्हा संपर्क प्रमुख शंकर बोरकर,युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी, शिवसेना जिल्हा आघाडी प्रमुख शामल वडणे,दिलीप शाळू,परंडा शिवसेना तालुका प्रमुख मेघराज पाटील,भूम शिवसेना तालूका प्रमूख श्रीनिवास जाधवर,वाशी शिवसेना तालूका प्रमुख विकास मिळवणे,शिवसेना युवा नेते रणजीत पाटील,शिवसेना शहर प्रमुख इरफान शेख,माजी नगरसेवक इस्माईल कुरेशी, मकरंद जोशी,मैनुद्दीन तुटके, सत्तार पठाण,महादेव वारे,शंकर इतापे,शंकर जाधव,सुभाष शिंदे, दिलीप रणभोर,मधुकर गायकवाड,संतोष गायकवाड, प्रशांत गायकवाड,तुकाराम गायकवाड,रामलीग गायकवाड, अदि उपस्थित होते,

----------------------------------------------
सोशल मिडीयावर बोलणाऱ्यांनी समोर यावे 
मा.आ.ज्ञानेश्वर पाटील
      शहराच्या मध्यभागी ग्रामीन सह शहरातील जनतेला सोयीचे असलेले बसस्थानक स्थलांतर करण्याचा सल्ला पालकमंत्र्यांना देणाऱ्यांनी विचार करून द्यावा, व्यापाऱ्यांनी या निर्णयाविरोधात परंडा शहरात बंद पुकारला या बंदला सर्व राजकीय पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला होता. तरीही मंत्री सावंत यांचे सल्लागार,पदाधिकारी व चेल्यांनी स्थलांतराच्या विरोधात पुकारलेल्या बंद मध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी होऊ नये, जर कोणी बळजबरीने दुकाने बंद करण्याच्या प्रर्यत्न केला तर पोलीसांना कळवा असे घरी बसुन सोशल मिडीयावर बोलणारे बंद दिवशी दुकानदारांच्या बाजुने का आले नाहीत असा सवाल उपस्थीत करुन हा बंद जर उद्धव बाळासाहेब ठावरे शिवसेनेचा असता तर सोशल मिडीयावर बोलणाऱ्यांना दाखवले असते असे पाटील म्हणाले तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले आज सल्लागार बस स्थांनक हलवण्याचा सल्ला देत आहेत उद्या किल्ला हलवीण्याचा सल्ला देतील.मदार संघात अनेक प्रस्न आहेत ते सोडवीण्याचे सल्ले द्यावेत असे मा.आ.ज्ञानेश्वर पाटिल यांनी सांगीतले,