दैनिक जनमत : उद्योजक देवदत्त मोरे यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश!

Saturday, January 21, 2023

उद्योजक देवदत्त मोरे यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश!

येडशी जि.प.गटात राष्ट्रवादीला भगदाड !!कसबे तडवळे:आगामी काळात  उस्मानाबाद जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद  पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येडशी जिल्हा परिषद गटातील प्रसिद्ध उद्योजक देवदत्त मोरे  यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राज्याचे आरोग्यमंत्री उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत पुणे येथील कार्यालयात जाहीर प्रवेश करण्यात आला .यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य शहाजी नाना वाघ, उस्मानाबाद पंचायत समितीचे माजी सभापती अकबर तांबोळी, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुधीर करंजकर, कसबे तडवळे  ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रताप करंजकर ,उस्मानाबाद तालुक्यातील राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत राजे भोसले ,येडशीचे  उपसरपंच शशांक सस्ते,   जवळ्याचे उपसरपंच आप्पासाहेब गुळवे, ग्रामपंचायत सदस्य गणेश करंजकर, सुभाष धनके, धनंजय भालेराव, हरून  शेख ,लखन वाघमारे, तुषार शिंदे ,बाळासाहेब करंजकर, विजय पवार ,योगेश होगले, सुनील डिकरे ,सोमनाथ करंजकर ,नितीन शिंदे, अविनाश तौर ,सुनील पाटील ,सोमनाथ शिंदे, प्रताप ढोणे ,सदाशिव तोडकरी, अजय पवार ,सोनू गरड, शिवाजी नलावडे, अँड.धैर्यशील सस्ते ,रोहित भोसले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.यावेळी आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून मार्गदर्शन करताना ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू असे आश्वासन दिले.यावेळी देवदत्त मोरे यांनी बोलताना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत विजय खेचून आणून पक्ष वाढीसाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.यावेळी बाळासाहेबांची शिवसेना उस्मानाबाद जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे ,अनिल खोचरे, तालुका प्रमुख अजित लाकाळ व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.