शेत रस्त्या संदर्भात न्याय मिळत नसल्याने कंडारी येथिल शेतकऱ्याचा प्रजासत्ताकदिनी तहसिल कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखुन शेतकरी सुरवसे यास रोखले पुढील अनर्थ टळला

परंडा (भजनदास गुडे  दि २६ जानेवारी ) शेतरस्त्या वरील अतिक्रमन काढण्याच्या मागणीची प्रशासन दखल घेत नसल्याने परंडा तालूक्यातील कंडारी येथिल शेतकरी संजय सुरवसे यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सकाळी परंडा तहसिल  कार्यालयाच्या परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाकडून न्याय मिळत नसले मुळे संतप्त झालेला शेतकरी संजय सुरवसे यानी तहसिल कार्यालयाच्या परिसरात विषारी औषध पिण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी सुरवसे यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. कंडारी येथील शेतकरी संजय विठ्ठल सुरवसे यांनी जिल्हाधिकारी,तहसिलदार यांना निवेदन देऊन कंडरी येथिल जमीन सर्वे नंबर ३०८,३०९,१५ आणी १८ मधील बांध रस्त्यावर रामा सुरवसे कमलबाई सुरवसे, यांनी अंब्याची झाडे लावली आहेत तर संतोष सुरवसे यांनी शेततळे खोदून अतिक्रमन केले असल्याची तक्रार दाखल केली होती .पालक मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या जनता दरबारात तक्रार दाखल करून रस्ता खुला करण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने न्याय मिळत नसल्यामुळे संजय सुरवसे यांनी टोकाचे पाऊल उचलून तहसिल कार्यालयाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतकरी संजय सुरवसे यांचे बंधू गणेश सुरवसे यांनी रस्त्यावरील अतिक्रमन काडून रस्ता खुला करावा अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment