लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची दोघांवर कारवाई
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढत आहे. सरकारच्या योजनांना खीळ बसवण्यात लाचखोर कारणीभूत असतात. प्रधानमंत्री आवास योजनेचे मंजूर अनुदानाचे दुसऱ्या हप्त्याचे बिल काढण्यासाठी सय्यद परवेज सलीम,वय 31 वर्षे पद :- ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी 10000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 8000/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून दयानंद विश्वनाथ टिकंबरे ,वय 57 वर्षे पद: - शिपाई, ग्रामपंचायत कार्यालय आष्टाकासार ता.लोहारा यांचे मार्फतीने 8000/- रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वीकारली. सध्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.सापळा अधिकारी :- विकास राठोड, पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिले तर संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद,विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद, प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद, यांचे मार्गदर्शन लाभले तर सापळा पथकात - पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, विष्णू बेळे यांचा समावेश आहे
No comments:
Post a Comment