जिल्हाधिकारी यांनी खासापुरी, स्त्री रुग्णालय व उप जिल्हा रुग्णालयाच्या नियोजीत जागेची केली पाहणी

खासापूरी येथील स्थलांतरीत कुटूंबाची जिल्हाधिकारी यांनी घेतली भेट 


स्थलांतरीत कुटूबांच्या जागा वाटपाचा प्रश्न काही दिवसातच मार्गी लावणार जिल्हाधिकारी यांची माहिती
परंडा ( दि २१ - भजनदास गुडे  )सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने परंडा तालूक्यातील खासापुरी गाव खाली करण्यात आले,आणी ३०० कुटूंबाचे संसार उघड्यावर पडले.

      उघडयावर पडलेल्या बेघर स्थलांतरीत कुटूंबाच्या मदतीला आरोग्यमंत्री तथा पालक मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत धाऊन आले त्यांनी स्वखर्चाने जमीन खरेदी करून स्थलांतरीत कुटूबांना घरासाठी जागा देण्याची घोषणा केली.या मुळे बेघर स्थलांतरीत खुल्या वर्गातील कुटूंबांना दिलासा मिळाला आहे.

      खासापुरी येथिल स्थलांतरीत कुटूंबाची जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी दि २१ रोजी सकाळी भेट घेऊन जागेची पाहणी केली व काही दिवसातच स्थलांतरीत कुटूबांना जागेचे वाटप करण्या येणार असल्याची  माहीती सांगीतली.

       १०९ दलित कुंटूबासाठी प्रशासणाकडून दिनदयाल उपाध्ये योजनेतून घर बांधकामा साठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.तर रमाई आवास योजनेतून घरकुल देण्यात येणार आहे.

        तसेच खुल्या वर्गातील स्थलांतरीत कुटूंबांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून १२९ घरकुले तर एन टी वर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून २१ कुटूंबाना  घरकुले देण्यात येणार आहेत यासाठी घरकुल देण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

     आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी परंडा शहरात १०० खाटांचे स्त्री रुग्णालय व १०० खाटांचे उप जिल्हा वर्धीणी रुग्णालयास मान्यता दिली आहे.

      मंगळवार पेठ येथील जुन्या नागरी दवाखन्याच्या जाग्यावर १०० खाटांचे रूग्णालय तर एस टी डोपो समोरील खुल्या जागेत १०० खाटांचे स्त्री रूग्णालय उभारण्यात येणार आहे.या संभव्य जागेची जिल्हाधिकारी यांनी पाहाणी केली.

       यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.राहुल गुप्ता,उपविभागीय अधिकारी रोहिनी नऱ्हे, तहसिलदार रेणूकादास देवणीकर,गटविकास अधिकारी संतोष नागटिळक,वैद्यकीय अधिकारी डॉ.अबरार पठाण, नायब तहसिलदार सुजित वाबळे, एसटी अगार प्रमुख राहुल वाघमोडे,बळीराजा शेतकरी संघटणेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सौदागर टोंपे, मंडळ अधिकारी दुरगाप्पा पवार, तलाठी चंद्रकांत कसाब, खासापुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच अरूणा चव्हाण,शंकर चव्हाण,दिपक भापकर,माजी सरपंच नितीन घाडगे,अनिल घाडगे,बाळासाहेब कोळेकर, यूवराज कसबे,विजय शिंदे, विजय देशमुख यांची उपस्थिती होती  .

Post a Comment

Previous Post Next Post