दैनिक जनमत : 'दिलखुष' करणे पडले महागात, लाच घेताना घेतले ताब्यात

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Wednesday, February 1, 2023

'दिलखुष' करणे पडले महागात, लाच घेताना घेतले ताब्यात

 


उस्मानाबाद - जिल्ह्यात पंचायत समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे गेल्या काही दिवसांत गाजत आहेत.  महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत उमरगा येथे गोठ्याचे सेड बांधकाम अनुदान मिळणे कामी दाखल केलेल्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी आरोपी कनिष्ठ लोकसेवक बुध्दार्थ ग्यानु झाकडे यांने २ हजारांची मागणी तक्रारदाराकडे केली होती ही लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली आहे यावेळी सापळा पथकात पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विशाल डोके सचिन शेवाळे यांचा समवेश होता.सदरची सापळा कारवाई आज रोजी ०२:०४ वाजता दिलखूष टी हाऊस, पंचायत समिती उमरगा येथे करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे,पो. स्टे उमरगा येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

कांदा अनुदान (३५०₹) मिळण्यासाठी या आहेत अटी शर्ती

 चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदा...