शेतकऱ्यांनी कारखाना बंद बाबतच्या अफवावर विश्वास ठेवू नये- चेअरमन राहूल मोटे
परांडा (भजनदास गुडे) मराठवाड्यातील अग्रगण्य ईडा-जवळा येथील परंडा, भूम,वाशी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्या-साठी आधारवड असलेल्या "आयान मल्टीट्रेड एल.एल.पी"संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखाना लि.ईडा-जवळा या कारखान्याचा चालु गाळप हंगाम २०२२-२०२३ हा यशस्वीरित्या सुरळीतपणे सुरु असुन प्रति दिन ४००० मे.टन ऊसाचे गाळप कारखाना करीत आहे.शिवाय कारखान्याकडे ऊसतोड-वहातुक यंत्रणा सुध्दा भरपूर प्रमाणात ऊपलब्ध आहे.तसेच आयान- बाणगंगा साखर कारखान्याने हंगाम २०२२-२०२३ मध्ये आजपर्यंत ३७४२९१.५९९ मे.टन ऊसाचे गाळप केलेले असुन कारखान्याची दैनंदिन व सरासरी रिकव्हरी सुध्दा उस्मानाबाद जिल्ह्यात २ नंबर वर आहे.त्या अनुषंगाने कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना हंगामाची सांगता होणार नाही. अशी माहिती बाणगंगा कारखान्याचे चेअरमन मा.आ.राहुल भैय्या मोटे व आयान चे संचालक सचिन सिनगारे यांनी दिली आहे.
आयान-बाणगंगा साखर कारखानाने गाळपास येणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रक्कम रु. २३५०/- प्रमाणे पहिला हप्ता दिला असुन त्यानुसार ऊस उत्पादक शेतकरी यांच्या खात्यावर ऊस बिले वेळेत जमा केलेली आहेत व करीत आहोत. तसेच तोड-वहातुक बिले सुध्दा वेळेवर दिली जात आहेत. आयान-बाणगंगा साखर कारखान्याकडे गेल्या चार वर्षापासुन असणाऱ्यां वजन काटयाबाबत वाहतुकदार व ऊस उत्पादक शेतकरी यांच्याकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असुन कारखान्याच्या काट्याबाबत वाहतुकदार व शेतकरी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका नाही. कारखान्याने गेल्या चार वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार व कर्मचारी तसेच इतर देणी वेळेत दिलेली आहेत.
याही वर्षी ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतुक ठेकेदार यांचे पेमेंटचे वेळेत वाटप चालु आहे.आयान-बाणगंगा साखर कारखान्याने गेल्या ५ वर्षात सामान्यातील सामान्य शेतकऱ्याला आधार देण्याचे काम केले आहे.कारखान्याकडे ऊसाची नोंद केलेल्या सर्व शेतकऱ्याच्या ऊसाचे गाळप करण्यास कारखाना कटीबध्द आहे.तरी भागातील संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्यावरच गाळप हंगामाची सांगता होणार आहे.
तरी कारखाना बंद बाबत कुठल्याही अफवावर ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदार यांनी विश्वास ठेवू नये व चालु गळीत हंगामासाठी चांगल्या रिकव्हरीच्या दृष्टीने चांगल्या प्रतीचा ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे,असे आवाहन बाणगंगा कारखान्याचे चेअरमन मा.आ.राहुल भैय्या मोटे व आयानचे संचालक सचिन सिनगारे यांनी केले आहे.
यावेळी बाणगंगा कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर संतोष तोंडले,मुख्यशेती अधिकारी विठ्ठल मोरे,चीफ इंजिनियर जेशकुमार शिंदे,चीफ अकौंटंट विशाल सरवदे,स्टोअर किपर नानासाहेब जाधव यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.