अनाधिकृत शाळांवर प्राथमिक शिक्षणाधिकारी साळुंके यांनी केली धडक कारवाई

   उस्मानाबाद दि.२ (प्रतिनिधी) - अनाधिकृत शाळा लगेच बंद करा. अन्यथा अनाधिकृत शाळा चालविल्याबद्दल बेंबळी शाळेला २ लाख रुपये दंड ठोठावण्यात येईल. तर दर दिवशी १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असे स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी तालुक्यातील बेंबळी येथील एका इंग्लिश माध्यमांच्या शाळेला काढला आहे. तर इथल्याच अन्य एका पूर्व प्राथमिक शाळेला देखील शाळा चालविण्याची परवानगी सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील आयडियल नॉलेज फॉर चिल्ड्रन्स स्कूल व इंग्लिश स्कूल, बेंबळी या दोन अनाधिकृत शाळांबद्दल प्राप्त एका तक्रारीवरून गट शिक्षणाधिकाऱ्यांनी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यामार्फत या शाळांची कांही महिन्यांपूर्वी चौकशी केली होती. त्यानुसार ही दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे दि.२ फेब्रुवारी काढलेल्या दोन वेगवेगळ्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या दोन शाळा बंद न केल्यास या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापन यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविलेल्या आदेशात नमूद केले आहे.

आदेशानुसार काय आहे दंडात्मक कारवाई केली असून विना परवानगी सुरू असलेल्या अनधिकृत शाळा चालविणे कायद्यानुसार मान्य नाही. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील नियम १८ च्या पोटनियम (५)मधील तरतुदीनुसार अनाधिकृत शाळेच्या व्यवस्थापणास एक लाख इतका दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास दहा हजार रुपये प्रती दिवशी इतका दंड ठोठावण्याची तरतूद आहे.

No comments:

Post a Comment