दैनिक जनमत : वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Monday, February 20, 2023

वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटपसलगरा,दि.२०(प्रतिक भोसले)

वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वत्र जेवणावळी घालण्याच्या प्रथा आपण बहुतांशी ठिकाणी पहातो. माञ त्या सोबतच वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून आगळी वेगळी श्रध्दांजली वाहण्यात आली आहे. वडिलांच्या व्दितीय पुण्यतिथीनिमित्त जेवणावळी कार्यक्रमा बरोबरच शामराव (आण्णा) मुसळे, रामराव (बापु) मुसळे, आणि सचिन मुसळे या भावांनी आपल्या वडिलांच्या म्हणजेच कै.विजयकुमार (काका) शामराव मुसळे यांच्या व्दितीय पुण्यतिथीनिमित्त दि.२० फेब्रुवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. वडिलांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरणारी आहे. मात्र अलिकडच्या काळात हे प्रसंगही मोठे इव्हेंट म्हणुन साजरे केले जातात. फ्लेक्सबाजी, जाहिराती, भोजनाच्या मोठमोठया पंगती मात्र या गोष्टी बाजूला सारत अवाजवी खर्च टाळुन सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्य वाटप आणि ह.भ.प. गोपाळ (आण्णा) वासकर महराज यांची किर्तनसेवा या माध्यमातून वडिलांच्या स्मृती वेगळ्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न तालुक्यातील गंधोरा येथील मुसळे परिवाराकडुन करण्यात आला आहे. 

अशा प्रकारे शालेय साहित्याचे वाटप करून एक वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. या वेळी सरपंच बबिता राठोड, तंटामुक्त अध्यक्ष संतोष मुसळे, माजी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शामराव (आण्णा) मुसळे, पोलीस पाटील गजेंद्र कोनाळे, सुरेश मुसळे, रामराव (बापु) मुसळे, सचिन मुसळे, सुधीर पाटील, महेश पाटील, संभाजी मुसळे, अरुण पौळ, मोजम मुल्ला, लक्ष्मीकांत कुलकर्णी, मुख्याध्यापक जट्टे, श्रीमती करडे, श्रीमती भोसले, चव्हाण, प्रवीण पाटील, प्रवीण भोसले, बालाजी पाटील, महादेव भोसले, सुनील सोनटक्के यांच्या सह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.