प्रशासनाचा सावळा गोंधळ, उरुसामध्ये प्रथमोपचार केंद्रच नाही

 


उस्मानाबाद - उस्मानाबाद येथे हजरत ख्वाजा शमशोद्दिन गाजी रहे यांचा उरूस सुरू असून यातील चिरागा या धार्मिक विधी दरम्यान आज पहाटे अडीच च्या दरम्यान वळू घुसल्याने गोंधळ होऊन १४ भाविक जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.  कोणतीही यात्रा असेल तर भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रथमोपचार केंद्र सुरू करणे अपेक्षित असते मात्र उरुसामध्ये कोठेच प्रथमापोचार केंद्र आढळून आले नाही. उस्मानाबाद येथील हा दर्गाह भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा दर्गाह असून लाखो भाविक या ऊरुसासाठी येत असतात. यात अबालवृद्धांचा समावेश असतो. आरोग्याबाबत काही समस्या निर्माण झाल्यास उरुसाच्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र असणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी यावेळी बोलून दाखवली. याबाबत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 


ही अनपेक्षित घटना 

उरुसामध्ये घडलेली घटना ही अनपेक्षित आहे. उरूस होणाऱ्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजना बाबत सूचना केलेल्या आहेत. आमची एक टीम सायंकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत उरुसामध्ये भेट देऊन देखरेख करत असते.

 वृषाली तेलोरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

No comments:

Post a Comment