६७ लाखाच्या मुद्देमालासह दारु जप्त एक्साईज कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाची कारवाई

 कोल्हापूर, दि. ४ (अमोल कुरणे) राज्य उत्पादन शुल्क एक्साइजचे कोल्हापूर जिल्हा अधीक्षक रविंद्र आवळे, उपअधीक्षक आर.एल. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाने उचगाव, ता. करवीर हद्दीत हायवे क्र. ४ तावडे हॉटेल चौका मध्ये एका संशयित आयशर चालकास पकडून आयशर कंटेनर नं. एम.एच.०८ ए. पी. ५०८० ची तपासणी केली असता, आयशर कंटेनरमध्ये गोवा बनावटीची विदेशी मद्याने भरलेले १८० व ७५० मिलीचे ५०० बॉक्स आणि बीअरचे १२० बॉक्स असे एकूण ६२० बॉक्स मद्य मिळुन आले.

या प्रकरणी सुरेश रामजीवन बिश्नोई वय २४ रा. ढाणी धोरिमाना, जि. बारमेर, राजस्थान याला अटक करण्यात आली आहे.  ५२,०३,२०० चे मद्य व आयशर वाहनासह एकूण मुद्देमाल ६७,०३,२०० चा आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथक प्रमुख निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, दुय्यम निरीक्षक एस. एल. नलवडे, जवान सचिन काळेल, राजेंद्र कोळी, मारुती पोवार, जय शिनगारे यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment