रुग्णालयातील मेडिकल मधून औषधे घेण्याची सक्ती करता येत नाही

वाचा हे परिपत्रक




बदलत्या जीवनशैलीमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. घरात आजारी व्यक्ती नाही असे क्वचितच एखादे घर पाहायला मिळते. प्रत्येकाला शासकीय रुग्णालयात कमी खर्चात, वेळेत उपचार मिळतील याची शास्वती न वाटल्याने खाजगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. उपचारामध्ये औषधांचा खर्च अधिक असतो. औषधांचा खर्च कमी व्हावा यासाठी जेनरिक औषधे देखील असतात मात्र ती स्वस्त औषधे रुग्णालयातील मेडिकल मध्ये उपलब्ध नसतात आणि जी उपलब्ध औषधे आहेत तीच औषधे रुग्णालयातील मेडिकल मधूनच घेण्याची सक्ती केली जाते त्यातच रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असते. काही रुग्ण याविरोधात आवाज उठवतात मात्र त्याबाबत नेमके परिपत्रक काय आहे, नियम काय आहेत हेच माहिती नसल्याने तो आवाज तिथेच दडपला जातो.

"रुग्णालयातील औषधी दुकानातूनच रुग्णांनी औषधांची खरेदी करावी अशी सक्ती नाही, रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधांची खरेदी करु शकतात" अशा आशयाचा फलक ठळकपणे संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना दिसतील अशा दर्शनीय भागात प्रदर्शित करावा, अशा सूचना देण्याचे परिपत्रक यापूर्वीच काढले आहे. औषध सक्ती केल्यानंतर तक्रार करताना हे परिपत्रक आणि संदर्भ महत्वाचा आहे.



जिल्हानिहाय वसतीगृहे सुरु करणेबाबत कार्यपध्दती व नियमावली


https://www.dainikjanmat.in/2023/03/blog-post_14.html

No comments:

Post a Comment