दैनिक जनमत : विद्यापीठ उपकेंद्रातील विश्रांतीगृहाच्या उद्घाटनाचा लपून छपून घाट?

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Wednesday, March 8, 2023

विद्यापीठ उपकेंद्रातील विश्रांतीगृहाच्या उद्घाटनाचा लपून छपून घाट?




धाराशिव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील विश्रांतीगृह आणि उपहारगृहाच्या उद्घाटनाचा लपून छपून घाट विद्यापीठ प्रशासनाने घातला आहे. आज दि ९ मार्च रोजी विद्यापीठ कुलगुरूंच्या हस्ते कोनशिला उद्घाटन करण्यात येणार असून याबाबत माध्यमांना तर दूरच ठेवण्यात आले त्यासोबत लोकप्रतिनिधींना याची साधी कल्पना देखील दिली नाही.  विद्यापीठाच्या काही सिनेट सदस्यांना देखील कळविण्यात न आल्याने हा लपून छपून उद्घाटनाचा घाट नेमका कशासाठी घालण्यात आला असा प्रश्न पडतो आहे.

विद्यापीठ उपकेंद्र जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षणासाठी महत्वाची भूमिका पार पाडते तिथे येणाऱ्या अभ्यांगताना विश्रामगृह आहे हेच कळू नये विश्रामगृहात नेमक्या कोणत्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. आतील काम चांगल्या दर्जाचे आहे की नाही हे कळू नये असे विद्यापीठ प्रशासनाला वाटते का?

या उद्घाटनाच्या कार्यक्रमाबाबत विचारण्यासाठी संचालक डी. के. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा ऑफिशियल बैठकीनिमत्त कुलगुरू उपकेंद्रा येत आहेत त्या बैठकीनंतर कोनशिला उद्घाटन करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच याची कोणतीही कार्यक्रम पत्रिका छापली नाही असेही सांगितले.



मनमानी कारभार!

 हुकूमशाही पद्धतीचा कारभार कुलगुरूंनी नेहमी केला आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता, सिनेट सदस्यांना विश्वासात न घेता, व्यवस्थापनाच्या सदस्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत असून माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा लहान भाऊ असल्यासारखे कुलगुरू वागत असल्याची प्रतिक्रिया माजी सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांनी दिली

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मिळाली ३ कोटींची थकहमी

  धाराशिव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. उस्मानाबाद, नांदेड व मुंबई या बँकांनी सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासना...