दैनिक जनमत : ढगपिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गुंफाताई मासाळ यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Saturday, March 11, 2023

ढगपिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गुंफाताई मासाळ यांची बिनविरोध निवड

 


परंडा ( प्रतिनिधी) परंडा तालूक्यातील ढगपिंपरी ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी गुंफाताई मासाळ यांची बिन विरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच निवडी साठी ढगपिपरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि १० मार्च रोजी विशेष सभा घेण्यात आली.

सरपंच पदासाठी सौ.गुंफा लहु मासाळ यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता.निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी आबासाहेब सुरवसे यांनी गुंफा मासाळ यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

     यावेळी ग्रामसेवक श्रीराम खरात,ग्रा.पं सदस्य राजेंद्र परबत,  चंपावती जाधव यांच्यासह मा.सरपंच डाॅ.नवनाथ वाघमोडे, मा.सरपंच बप्पाजी जाधव, भाजपा तालुका उपाध्यक्ष रवि गरड,शहाजी सोलंकर,वैजिनाथ आबा हिवरे,शहाजी गरड,सुरेश येवारे,नितीन गरड,लहु मासाळ, राजेंद्र कुलकर्णी,वि.का.सोसायटी चेअरमन रमेश गरड,बळीराम हिवरे,ज्ञानदेव वाघमोडे,बापू करळे,अभिमान बारसकर,पोलीस पाटील हरिदास हावळे उपस्थित होते.