परंडा तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर

ज्वारी,गहू,हरभरा,कांदा अंबा, द्राक्षे पीकांचे मोठे नुकसान 

शेतकरी आर्थीक संकटात, शासनाने आर्थीक मदत करावी रमेश गणगे यांची मागणीपरंडा भजनदास गुडे ( दि ९ एप्रिल) 

८ एप्रील रोजी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसा मुळे परंडा तालूक्यातील शेतकऱ्यांच्या ज्वारी,गहू,हरभरा, कांदा,मका या सह अंबा,द्राक्षे, पपई,कलीगड फळ पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.अवकाळी पावसाने मळणीसाठी काढून ठेवलेला  हरभरा,गहू,ज्वारीचा कडबा  भिजून शेतकऱ्यांचे मोठे आर्थीक नुकसान झाले आहे.   परंडा तालूक्यातील आसू, जवळा,सोनारी,अनाळा,परंडा या पाचीही महसुली मंडळात ८ एप्रिल रोजी सरासरी २६.५ मिली मीटर पावसाची नोंद झाली असुन रात्रन दिवस काबाड कष्ठ करून   व हाजारो रूपायाचा आर्थीक खर्च करून जोपालेली पीके हाता तोंडाशी आली आसतानाच अवकाळी पावसाने भूईसपाट झाली आहेत.   सरकार शेतकऱ्यांच्या धान्याला हमी भाव देत नाही आणी निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही शेतकऱ्यांनी आर्थीक खर्च करुन व रात्रन दिवस काबाड कष्ट करून पिकवलेले धान्य कवडी मोल दराने विकावे लागत असल्याने शेतकरी सतत आर्थीक संकटाचा सामना करत आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहाणी केली व झालेल्या नुकसानीची प्रशानाने त्वरित पाहानी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थीक मदत करावी आशी मागणी केली आहे.


मळणीसाठी काढून ठेवलेला लाखो रूपयाचा हरभरा पाण्यात

   शेती मशागत,बीयाने,खते या साठी हाजारो रुपये खर्च करून व रात्र दिवस कष्ठ करुन दोन एक्क क्षेत्रावर हरभरा पीकाची जोपासना कली होती.पीक जोमात आले होते.हरभरा पीक मळणी साठी शेतात काढून ठेवले होते.दि.८एप्रिल रोजी सायंकाळी अचानक सुसाटवारा,विजाच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली या पावसात माझे हभरा पीक पूर्ण भिजून लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.


      शासनाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आर्थीक मदत द्यावी .

    राजाभाऊ गायकवाड - शेतकरी ब्रम्हगाव.


 ज्वारीचे पीक पाण्यात, ज्वारी सह चाऱ्यांचे हजारो रुपयाचे नुकसान दोन एक्कर क्षेत्रातील काढणीला आलेले ज्वारीचे पीक शेतात वाळण्या साठी काढून ठेवले होते.दोन दिवसात ज्वारीची मळणी करायची होती. मात्र दि.८ एप्रिल रोजी अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात हाजारो रुपयाच्या ज्वारी व कडबा चाऱ्याचे नुकसान झाले आहे.शासनाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून आर्थीक मदत द्यावी.

नागनाथन पाटील,शेतकरी आवारपिंपरी

Post a Comment

Previous Post Next Post