धाराशिव येथे वंचित बहुजन युवा आघाडीची प्रथम बैठक संपन्न

 


धाराशिव दि. २५ (प्रतिनिधी) - वंचित बहुजन युवा आघाडीची  नूतन कार्यकारणीची प्रथम आढावा बैठक दि. २४ मे रोजी शासकीय विश्रामगृह शिंगोली येथे संपन्न झाली आहे.वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक हपार पडली.सर्वप्रथम सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची पक्षाचे क्रियाशील सभासद म्हणून नोंदणी करण्यात आली.पक्षाचे नियम ,शिस्त ,आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यातील तालुका कार्यकारणीची मजबूत बांधणी,अशा अनेक मुद्द्यावरती बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.सर्व नुतन पदाधिकाऱ्याचा यावेळी सत्कार करण्यात आली आहे तसेच रमाई मासिक ,रमाई फाउंडेशन, रमाई प्रकाशन, भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या वतीने महिलांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या मानाच्या रमाई पुरस्कारासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा सचिन लोखंडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आहे. या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव,युवा जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण,सोमनाथ नागटिळक, उपाध्यक्ष वैभव गायकवाड, महासचिव धीरज शिंदे, सचिव विशाल वाघमारे, संघटक बाबा वाघमारे, प्रवक्ता गोविंद भंडारे सदस्य फिरोज तांबोळी आदीसह युवक आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment