अभिमानास्पद! सलगऱ्याचा शौर्य सिंगापूरात तबला वाजवणार

 


सलगरा,दि.२६(प्रतिनिधी) 

अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन, पुणे आणि 'इंटरनॅशनल डान्स कौन्सिल, पॅरिस' यांच्या संयुक्त विद्यमाने  'युनिव्हर्सल हार्मनी' या नावाने ९ ते १६ मे या कालावधीत विवीध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये छोट्या गटासाठी आयोजित करण्यात आलेल्या तबलावादन स्पर्धेमध्ये सलगरा (दि.) येथील शौर्य बोधणे वय (०८ वर्षे) याने प्रथम क्रमांक पटकावून गावचे नाव लौकीक केल्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. 


विशेष म्हणजे या आयोजित स्पर्धेत ३६ राज्यांमधून २५०० स्पर्धक आले होते. या मध्ये छोट्या गटातून शौर्य ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शौर्य चे वडिल शिवराज महावीर बोधणे हे स्वतः (एम.ए. तबलावादक) आहेत यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच शौर्य ची आवड बघुन त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ते रोज दोन ते तीन तास त्याच्याकडून रियाज करून घेतात. बोलताना त्याचे वडील म्हणाले की, आता त्याची निवड दि.२० नोव्हेंबरला सिंगापूरला होणाऱ्या स्पर्धेसाठी केली गेली आहे त्या मुळे आता सलगऱ्याचा शौर्य सिंगापूरात तबला वाजवणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. 


दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेल्या काही कार्यक्रमांमध्ये शिवराज बोधणे यांचा सहभाग आहे. बोधणे यांना विविध पुरस्कार या पुर्वी देखील भेटले आहेत. या वर्षीचा नेहरू युवा केंद्र (भारत सरकार) आणि श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था, ईचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय श्रमशक्ती ग्लोबल कलारत्न अवॉर्ड, (२३ एप्रिल) रोजी नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह, ईचलकरंजी येथे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

मी घेतलेल्या कष्टाचे कुठे तरी त्याने चिज केले घरामध्ये या साठी पोषक वातावरण असल्यामुळे त्याला हे शक्य झालं त्या बरोबरच जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रीमुळे त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोणतीच गोष्ट हि अवघड नसते सराव - रियाज या मुळे अवघड वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आपोआप सोप्या होत जातात. कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचं असेल तर सरावा शिवाय पर्याय नाही असे बोलताना शौर्य चे वडील शिवराज बोधणे म्हणाले

No comments:

Post a Comment