श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आता दर्शन पास घेण्याची आवश्यकता नाही

धाराशिव - महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आता दर्शनपास घेण्याची आवश्यकता नाही. श्री तुळजाभवानी मंदिरात संस्थान मार्फत भाविकांना धर्मदर्शन व मुखदर्शनासाठी मोफत (Free) पास घेणे बंधनकारक होते.

 विश्वस्त समितीच्या परिपत्रक (Circulation) निर्णयानुसार दिनांक 26/05/2023 (शुक्रवार) रोजी पासून धर्मदर्शन व मुखदर्शनासाठी भाविकांना दर्शनपास घेण्याची आवश्यकता असणार नाही.

तरी मुखदर्शन व धर्मदर्शन घेणाऱ्या भाविकांना पास बंद करण्यात येत आहेत, असे मंदिर प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment