महात्मा गौतम बुध्द आणि त्यांची विचारधारा

 


    आज वौशाखी पोर्णिमा, अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, अंहिसेचा संदेश देणाज्या तथागत महात्मा गौतम बुध्दाचा जन्मदिवस. वौशाखी पोर्णिमेला बौध्द धर्मात अतिशय महत्त्व आहे. या पोर्णिमे दिवशी बुध्दाचा जन्म झाला. याच दिवशी बुध्दाला बोधीचा, सत्याचा साक्षात्कार झाला आणि याच पोर्णिमेला कुशी नगर येथे बुध्दाचे महापरिनिर्वाण झाले. जगाच्या पाठीवर कोणत्याही महामानवाच्या जीवनात असा योग आल्याचे माझ्या वाचनात नाही.
    गौतमबुध्द हे प्रभावशाली व्यक्तिमत्वाचे विद्वान, तत्त्वज्ञ, प्रभावी वाद-विवाद पट्टू, दयाशील, समतावादी होते. सौंदर्य महालात असते. सौजन्य मातीच्या घरात दिसते अशी त्यांची धारणा होती. बुध्द अहिंसावादी, विनयशील व नम्र असल्यामुळे अंहिसेने हिंसेला व अक्रोधाने क्रोधाला जिंकावे यावर त्यांचा गाढ विश्वास होता. त्यांची विद्ववता व नम्रता पाहून एक पाश्चमात्य विचारवंत आपल्या आत्मचरित्रात म्हणतो की, 'मानवाच्या गुरुमध्ये एवढी वौशिष्टे असणे संभवत नाही. गौतम बुध्द उच्चकुलीन राजपूत्र असूनही त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी व दु:खाचे कारण शोधण्यासाठी राजवौभव, धनदौलत, राजमहाल, नात्या-गोत्याचा त्याग केला. कर्णमधूर वाणी, मोहक वक्र्तृत्व त्यामुळे बुध्द विश्वासनीय व पुजनीय गुरुचा गुरु आहेत.
    गौतम बुध्दाची मानवतेची शिकवण आजही जगातील प्रत्येक मानव घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रेरणादायी आहे. बुध्द म्हणतात मानसाचे जीवन दु:खमय शोकमय असून वार्धक्य व मृत्यु दु:खातच होतो. मोह, इच्छा, आसक्ती ही एका दु:खातून दुसरे दु:ख निर्माण करीत असते. शरीर, इंद्रिय, स्पर्श, वेदना, भावना ही दु:ख निर्मितीची कारणे आहेत. ही इच्छा नाश करण्यासाठी दु:खाची कारणे नष्ट करुन निर्वाण प्राप्त करता येते. दु:ख विरहित शांतता प्राप्तीसाठी अंधश्रध्दा व भ्रामक कल्पना वज्र्य करावी. सत्याचा डोळसपणे स्विकार करुन जीवन मंगलमय करण्याचा संकल्प करावा. आपले बोलणे, सत्य, मधूर, प्रेमळ, दयाळू असावे ते खोटे, कठोर, चछोर नसावे. निंदनीय बोलण्यासाठी वाणीचा दुरुपयोग करु नये. मानवाने सदाचाराचे वर्तन ठेवावे. हिंसा, चोरी, व्याभिचार, दुष्कृत्य वज्र्य करुन योग्य मार्गाने उदरनिर्वाह करावा. मादक द्रव्य किंवा दारुचे सेवन करु नये. आपल्या मनातील दृष्ट प्रवृत्ती काढून मनात सत्तप्रवृत्ती कसल्याही प्रलोभनाने मनात मोह, इच्छा आसक्ती निर्माण होऊ नये यासाठी सावधगिरी बाळगावी. मन शुध्द ठेवल्याने मनात एकाग्रता निर्माण होवून दु:खाचा सर्वनाश होतो व निर्वाण प्राप्त होते.
    गौतम बुध्द म्हणतात, प्रज्ञा, शील, करुणा ही त्रिसुत्री बुध्दधम्माचा आधारस्तंभ व गाभा आहे. प्रज्ञा ही लोककल्याणासाठीची विद्ववता असून शील हे या प्रज्ञेचे सौभाग्य आहे. त्यांच्या जोडीला करुणा हवीच आहे. दु:खी पिडीताबद्दल दया कळवळा आवश्यकच आहे. म्हणून जन्माने उच्च, निच्च ठरत नसून कर्माने ठरतो. त्यासाठी मानसाने सत्यकर्मासाठी सदाचारी बनले पाहिजे. वेदाचे अध्ययन, उपासना, स्वर्ग, नर्क, धर्मविधी, यज्ञवौकल्य, उपास-तापास या बाबींना बौध्द धर्मात अजिबात स्थान नाही. तर बौध्द धर्माने वर्ण, वर्ग, जाती, विषमता नाकारुन समता व समानतेला केंद्र बिंदू मानले आहे. उच्च-निच्च, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत सर्व समान आहेत. नद्या समुद्रात विलीन झाल्यानंतर त्यांचे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही, तसेच बौध्द धर्माचे आहे.
    गौतम बुध्दाने जगातील मानव जातीला मंगलमय सुखी जीवन जगण्यासाठी शांती, अहिंसा, समता, दयाशीलते बरोबरच दैनंदिन जीवनासाठी साधी सोपी संहिता विषद केलेली आहे. ती संहिता प्रत्येक नागरिकांनी आचरणात आणणे आवश्यक आहे. हिंसा (प्राणीहत्या) करु नये, वाणीने कठोर बोलू नये, दुसज्याचा द्वेष करु नये, दुसज्याच्या संपतीचा लोभ धरु नये, दूराचारी विचार मनात आणू नये, दुरगुणापासून अलिप्त राहून दु:खी, पिडीत, संकटग्रस्त व्यक्तीला मदत करावी. मनात सकारात्मक विचार ठेवून नितीमत्तेने वर्तन करावे. पिडीतांची सेवा करावी, आई-वडील व वृध्दांची सेवा करावी, जीवनात सतत सदाचाराचे तत्व आचरणात आणावे. इतरांचे चांगले गुण आत्मसात करावे, आपल्यातील दुर्गूण दोष दूर करावे. त्यामुळे बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिद समाजात खज्या अर्थाने रुजेल आणि शांततामय मार्गाचा जीवनाचा सर्वांगीण विकास होईल.
    बौध्द धर्म हा विज्ञानाचे अधिष्ठान असलेला मुळ भारतीय धर्म असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करुन 14 ऑक्टोंबर 1956 ला आपल्या लाखो अनुयायासह बौध्द धर्माची दिक्षा घेतली. त्यावेळी बौध्द धर्माचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी अनुयायांना 22 प्रतिज्ञाची आचारसंहिता दिलेली आहे. त्यातील पंचशील आष्टांग मार्ग आणि 10 परिमिता याच्या आचरणा बाबत गेल्या 65 वर्षात आपली वाटचाल कशी होत आहे याचे आत्मचिंतन करणे आवश्यक वाटते. आज सामाजिक, शौक्षणिक, आर्थिक स्तर उंचावला असला तरी अंदाजे प्रमाण 30 % प्रमाणात आहे. उर्वरीत समाज हालाखीचे जीवन जगत आहे. त्यांचा आर्थिक, शौक्षणिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी शासना सोबतच प्रगत बौध्द अनुयायांनी पुढे येवून प्रयत्नशील राहण्याची सामाजिक बांधिलकी नाही का ? समाजात स्त्री-पुरुष समानता मानली जात आहे. परंतू मुलगी कितीही उच्चशिक्षीत असली आणि कायद्याने बंदी असूनही मुलीकडून हुंडा घेतला जातो. मुलगा नौकरदार जर असेल तर तो सोन्याच्या रुपाने तो स्विकारला जातो. मंगल परिणय झाल्यानंतर वधू-वरांना कुलदैवताच्या दर्शनाला पाठवले जाते. मंगल परिणय व अन्य उत्सवात मद्यप्राशन करुन अनुयायी नाचतात. याला बौध्द धर्मात मान्यता आहे का ? याचा आपण कधी विचार करणार आहोत. आपण बुध्द अनुयायी म्हणून आज बुध्द जयंतीच्या मंगलदिनी संकल्प करु या की आपले मंगलपरिणय व अन्य सोहळे साजरे करताना महात्मा गौतम बुध्दाचे तत्त्वज्ञान व विचारधारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र समाज परिवर्तनाचे विचार सतत ध्यानी, मनी ठेवून ते काटेकोरपणे आचरणात आणू या आणि आचारसंहितेप्रमाणेच वाटचाल करुया.

दिलीप प. कांबळे
+919922568587

Post a Comment

Previous Post Next Post