शालेय साहित्य विक्री दुकानांचे ऑडिट करण्याची मागणी

 


धाराशिव दि ६ (प्रतिनिधी) -जागृती फाउंडेशनच्या वतीने पाठ्य पुस्तके दुकाने यांचे ऑडिट करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की शहरातील पाठ्य पुस्तके दुकानदार शालेय साहित्य विक्रीमध्ये ग्राहकांना अवाजवी किंमती घेऊन आर्थिक पिळवणूक करत आहेत ग्राहकांना जीएसटी व सीजीएसटी युक्त देयके दिली जात नाहीत. ग्राहकांना बील मागितले तर थातुर मातूर बीले दिली जातात. यातून हे पाठ्य पुस्तके (होलसेल) दुकानदार ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करतात आणि पैशाचा अपहार करून आयकर विभागास ही चुना लावतात. त्यामुळे या दुकानांची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी. त्यामुळे विद्यार्थाची व पालकांची ही आर्थिक पिळवणूक होणार नाही. अगदी काल परवाच इयत्ता दहावीची आणि बारावीची निकाल लागला असून लवकरच पुढील शिक्षणासाठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी तुंबळ गर्दी आहे यात आपल्या शहरातील पाठ्यपुस्तक विक्रेते प्रिंटेड किमतीवर आणणे मनाला वाटेल तसे खुल्या साहित्यावर किमती लावून सर्वसामान्य ग्राहकांची लूट करतात यामुळे याकडे गांभीर्याने पाहून शहरातील सर्व दुकानदारांची बिलबुके, आयकर परतावा, जीएसटी, सीएसटी भरणा इत्यादी तपासण्या करण्यात येऊन सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी असे निवेदनात नमूद केलेले आहे. या निवेदनावर विजय बनसोडे, आनंद गाडे, नंदकुमार हावळे, कुंदन वाघमारे, इन्नुस पटेल, बाबा वाघमारे, सोमनाथ नागटिळक, विद्यानंद वाघमारे ,बाळासाहेब जानराव आदींच्या स्वाक्षरी आहेत

No comments:

Post a Comment