भैरवनाथ शुगर च्या वतीने वडनेर ग्रामस्थांची दिपावली गोड

 

सरपंच जैनुद्दिन शेख यांच्या हस्ते  वडनेर येथील २९४ कुंटूबांना मोफत साखर वाटपपरंडा (दि१५ नोव्हेंबर) आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री डॉ.प्रा.तानाजी सावंत यांच्या सोनारी येथील भैरवनाथ शुगरच्या वतीने दिपावली सना निमीत्त परंडा तालूक्यातील वडनेर येथील २९४ कुंटूबाना दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रति कुटूब ५ कीलो मोफत साखरेचे वाटप करण्यात आले.

          राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.प्रा.तानाजीराव सावंत व भैरवनाथ शुगरचे चेअरमन शिवाजीराव सावंत यांच्या आदेशाने भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक तथा जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शना खाली परंडा तालुक्यातील नागरीकांची दिपावली गोड व्हावी या उद्देशाने मागील काही दिवसापासुन भैरवनाथ शुगरच्या वतीने परंडा तालुक्यातील नागरीकांना मोफत साखर वाटप करण्यात येत आहे.

          दि.१४ नोव्हेंबर रोजी या साखरेचे वडनेर / सरणवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच जैनुद्दिन शेख यांच्या हस्ते वडनेर येथील २९४ कुटुंबाना प्रति कुटुंब ५ किलो साखरेचे मोफत वाटप करण्यात आले.यामुळे ऐन दिपावली सनात भैरवनाथ शुगर कडुन मोफत ५ किलो साखर मिळाल्यामुळे गरीब व सर्व सामान्य कुंटूबाना दिलासा मिळाला आहे.

       यावेळी अपना वतन संघटनेचे हमीद शेख,वडनेर / सरणवाडी ग्रुप ग्रामपंचायती च्या नुतन ग्रा.प.सदस्या अनुराधा गायकवाड,माजी सरपंच सुरेश परदेशी,शिवसेना शाखा प्रमुख नवनाथ काशीद,कांतीलाल गोफणे, पप्पू लाडे,अस्लम शेख, आरीफ शेख,अंतू वायकुळे,अर्जुन जाधव, आनिल जाधव, सोहेल तांबोळी,चाँद शेख,मुजीब शेख,जावेद शेख,हैबत गायकवाड लक्ष्मण गायकवाड,गणेश सरवदे, आक्षय सरवदे,रज्जाक शेख,पांडू कोळी यांच्या सह कार्यकर्ते, ग्रामस्त मोठया संख्याने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment